Saturday, August 1, 2020

विश्वास

विश्वास
       मानवी जीवनात विश्वास या शब्दाला या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण बहुतांशी व्यक्तिव्यक्तीमधील नातेसंबंध व मित्रत्व यांवरच टिकवून राहते. जेवढा आपापसातील विश्वास जेवढा जास्त  तेवढा हे नातेसंबंध व मित्रत्व अधिक दृढ असते.
     असे असले तरी या वर्तमान जगात माणसाची प्रवृत्ती येवढा स्वार्थ होत चाललंय ना   त्याचा खरा स्वभाव कधीच दिसून येत नाही, दिसतात एक प्रत्यक्षात असतात एक. म्हणून कोणलोकांवर विश्वास ठेवताना  किती प्रमाणात विश्वास ठेवायला पाहिजे याचं  सावधगिरीने विचार करायला पाहिजे. 
     माझ्या मते, एकाद्याने एकाद्याचा विश्वास तोडला किंवा विश्वासघात केला, याचएव्हढं मोठं धोका कोणतीच असूच शकत नाही, कारण विश्वासघात झालेल्या व्यक्तीची मनाची अवस्था काय असू शकते त्या व्यक्तीलाच माहीत असते, आणि ते पचवणं किती अवघड असते त्या व्यक्तीलाच माहीत असत.
    माझ्या मते, जो विश्वास तोडतो ना तो आपला कधीच नसतो. आपल्या विषयी व आपल्या प्रगती, चांगुलपणा विषयी त्याच्या मनात पूर्वग्रहदुषित हमखास असते, तो अविचारी, अमानवीय व असंवेदनशील असतो, पण तो दिसू देत नाही. 
     म्हणून मित्रानो, स्वतःच किंवा दुसऱ्यांचं जीवन हे चित्रपट नाही, एक दिवसाचा सामना  व सराव सामना नाही, जीवन हे जीवन आहे व ते मौल्यवान आहे. त्याचे मुल्य पैशात व संपत्तीत कधीच होऊ शकत नाही. म्हणतात ना, चुका करा पण त्या चुकीमुळे एखाद्याच विश्वास तुटेल व एकाद्याच्या जीवनावर दूरगामी परिणाम होईल अशी चुका आयुष्यात करू नका. कारण एखादया वेळेस नकळत झालेली काही चूका माफी मागून सुधारता येते पण काही चुकीमुळे एखाद्याच विश्वासघात होत असेल तर असे चूका करणे टाळणे हे कधीही चांगले. कारण त्याचुकीमुळे एकाद्याच तुटलेला विश्वास हे कधीच माफी मागून सुधारता येत नाही. विश्वासघात केलेला व्यक्ती कायमचे स्मरणातून,आठवणीतून व मनातून निघून जातो, हे वास्तव आहे. म्हणून आयुष्यात चूका होणे परवडते पण कोणाचा विश्वास तोडणे किंवा विश्वासघात होणे कधीच परवडत नाही. म्हणून आयुष्यात व भविष्यात कधीही विश्वास देताना व विश्वासात घेताना याबाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजे तरच विश्वासाला तडा जाणार नाही, असे वाटते.

By...
S. M. Rachawad.

No comments:

Post a Comment

कोरोना महामारीचा विस्फोट: एक दृष्टीक्षेप

कोरोना महामारीचा विस्फोट: एक दृष्टीक्षेप जागतिक स्थिती थोडक्यात... 1 ते 10 लाख बाधित होण्यासाठी लागलेला कालावधी (सर्वाधिक बाधित राष्ट्र): 1)...