समज गैरसमज
ज्या प्रमाणे नाण्याचे दोन बाजू असतात तर त्याचप्रमाणे व्यक्तीचे स्वतः किंवा दुसऱ्या विषयी स्वभाव, प्रवृत्ती व परिस्तितीबाबत संभाव्यता मत ह्या दोन असतात, त्या एक म्हणजे समज व दुसरी गैरसमज.
माझा मते, स्वतः किंवा दुसरीविषयी स्वभाव, प्रवृत्ती व परिस्तिथी बाबतीत वास्तविकता न जनता/ वास्तविक माहीत नसताना/व प्रत्यक्षात त्यात तेथे काहीच नसताना एकाद्याविषयी किंवा स्वतः विषयी नकारात्मक/पूर्वग्रहदूषित/वाईट मत तयार होणे म्हणजे गैरसमज होय.
तर वास्तविकतेचि जाणीव होऊन जे मत तयार होते ते म्हणजे समज होय. समज हे स्पष्ट, शुद्ध व विश्वासहार्थ असते व ते सकारात्मकतेकडे,उन्नतीकडे व नातीसबंध सदृढतेकडे नेणारी ऊर्जा व माध्यम असते. तर गैरसमज हे अस्पष्ट, अविश्वास, नकारात्मकतेकडे ,अधोगतिकडे व संबंध खराब करणारे असते. कधी कधी एखादी गँभीर गैरसमज सुद्धा माणसाला उध्वस्त करू शकते व चांगले दृढ नातीसबंध खराब करू शकते. आपापसातील प्रेम, आदर, विश्वास कमी करते. यावरून गैरसमजची तीव्रता किती भयंकर असते, याची प्रचीती येते. माझा मते, व्यक्तीची समाधानता, प्रसन्नता, मनाची स्थिर अवस्था विचलित व चलबिचल होण्याकारणांपैकी गैरसमज हे एक कारण होऊ शकते. म्हणून गैरसमज सारखी मनाची वाईट अवस्था दुसरी असूच शकत नाही, कारण याठिकाणी खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून दुसऱ्याविषयी कोणी काही सांगितले तेंव्हा अंधविश्वासाने विश्वास ठेवून किंवा स्वतः ला स्वतः विषयी भ्रम तयार करून घेऊन गैरसमज करून घेणे हे कधीही न परवडणारे व घातक ठरु शकते. व्यक्तीचे व्यक्तिगत पातळीवर अतोनात नुकसान तर होतेच पण आपापसातील दृढ व नातीसबंध खराब होतात.
माझा मते, समज नसताना आयुष्यात गँभिर गैरसमजुतीमुळे झालेली/ होत असलेल्या/होणाऱ्या परिणामांचे व याचे मूल्य पैशात कधीच होऊ शकत नाही. कारण व्यक्तिगत पातळीवर जेंव्हा गँभिर गैरसमज निर्माण होतो तेंव्हा त्याचे आत्मविश्वास , स्वाभिमान खाली जाते. ज्या बाबतीत त्याचे गैरसमज झाले त्याबाबतीत तो पुढे कधीच जाऊ शकत नाही. उदा. ईश्वराने सर्वाना शरीर, बुद्धी व काही अंशी परिस्थिती सर्वाना सारखी दिली आहे, असे असताना देखील काहीजण प्राप्त परिस्थितीतुन बाहेर पडून यश मिळवतात. उलट काही जण जवळपास सारखी परिस्तिथी असताना देखील मागे का पडतात? तर मला असे वाटते की याठिकाणी त्यांची आपल्या मानसिकतेवर, सामर्थ्यावर व क्षमतेवर झालेली गैरसमज असू शकत नाही का? म्हणून व्यक्ती स्वतःला ओळखणे व स्वतःच्या सामर्थ्यावर, क्षमतेवर विश्वास ठेवणे खूप गरजेचे आहे. तसेच दुसऱ्याविषयी आपली मत तयार होण्यापूर्वी त्या परिस्तिथीकडे वास्तविकतेने, वैज्ञानिक दृष्टिकोणतेने, तार्किक तेने, सद्विविवेकबुद्धिने चार वेळेस विचार करून मत बनवली पाहिजे, तरच गैरसमज दूर होऊन समज पक्की होईल, असे वाटते.
Written by...
एस.एम.रचावाड
No comments:
Post a Comment