Saturday, August 1, 2020

कोरोना: जागरूकता व काळजी

कोरोना: जागरूकता व काळजी

       कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे , कोरोना झालेले रुग्ण आता बरे होत आहे व मृत्यूदर आता कमी होत आहे म्हणून आता तेवढी काळजी करण्याची गरज नाही असं काही जणांना वाटत. असे समजून गाफील राहणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण हा साथीचा आजार आहे. आपणास माहितच आहे कि जगातील काही देशात community spread  झाला तेंव्हा फार  मोठ्या प्रमाणात या साथीच्या रोगाचा प्रसार झाला. परिणामी एकूण बाधितांची संख्या व मृत्यु पावणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. काही देश विकसित असून व त्यांच्या आरोग्य व्यवस्था सक्षम असून देखील या वाढत्या संख्येला रोखण्यात अपयशी ठरत आहेत आणि या समस्येचा सामना करत आहेत. म्हणून या साथीच्या रोगाच्या प्रसारास वेळीच नियंत्रणात आणणे व त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याअगोदरच रोखणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक काळजी बरोबरच वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षितता बाळगणे खूप गरजेचे आहे. गरज नसताना घराच्या बाहेर पडणे टाळावे. तसेच शासनाच्या प्रत्येक धोरणास, निर्णयास सक्रीय प्रतिसाद व सहकार्य करावेत. तरच कुटुंबातील,समाजातील व देशातील लोकांच आरोग्य,जीवन सुरक्षित राहील व भविष्य उज्वल राहील. म्हणतात ना “सर सलामत तो पगडी पचास” म्हणजेच आपण जिवंत असलो तर या वाईट परिस्थितीमुळे होणारी आणि झालेली आर्थिक व इतर नुकसान भविष्यात नक्कीच भरून काढता येईल. 
शासनाने लागू केलेली टाळेबंदी व त्याचा कोरोना नियतंत्रनावर झालेला परिणाम याचे विवरण खालीलप्रमाणे:
1)ला टप्पा
मार्च 25 ते 14 एप्रिल
भारत एकुण बाधित: 562 महाराष्ट्र एकुण बाधित:122
मृत्यू:13                         मृत्यू:3                                                               
मृत्यू दर:2.31%                  मृत्यू दर:2.46%

2) रा टप्पा
15 एप्रिल ते ३ मे      
भारत एकुण बाधित :12340 महाराष्ट्र एकुण बाधित:2916
मृत्यू:417                          मृत्यू:187
मृत्यू दर:3.38%                    मृत्यू दर:6.41%

3)रा टप्पा
4 मे 17 मे 
भारत एकुण बाधित:42533  महाराष्ट्र एकुण बाधित:12974
मृत्यू:1373                            मृत्यू:548
मृत्यू दर:3.23%                        मृत्यू दर:4.22%
                                                                                           
4)वा टप्पा 
18 मे ते 31 मे
भारत एकुण बाधित: 101139          महाराष्ट्र एकुण बाधित:35058
मृत्यू:3163                         मृत्यू:1249
मृत्यू दर:3.13%                     मृत्यू दर:3.56%

एकूण 4 टप्प्यातील: 
सरासरी मृत्यू दर: भारत:3.01%       सरासरी मृत्यू दर:महाराष्ट:4.16%

5)था टप्पा
1जून ते 30 जून
        (संदर्भ: लोकसत्ता 25 मे 2020)


        टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यापर्यंतच्या आकडेवारीवरून असे लक्षात येते कि,देशातील व महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या व कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसून येते. देशातील व महाराष्ट्रातील मृत्यू दर मात्र टाळेबंधीच्या तिसऱ्या टप्प्यापासून कमीकमी होत असताना दिसून येते. हे मृत्यू दर कमी होण्यामागील कारण शासनाने अलीकडील आरोग्यव्यवस्थेबाबतीत राबविलेले प्रभावी धोरण व लोकांमध्ये कोरोनाबाबतीत हळूहळू वाढत असलेली जागृती होय, असे वाटते. असे असले तरी महाराष्ट्राचे मृत्यू दर हे देशाच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येते. महाराष्ट्राची सरासरी मृत्यू दर हे 4.16 % असून तेच भारताची सरासरी मृत्यू दर हे 3.01 % एवढी आहे. आणि देशातील एकूण बधितांपैकी 22% बाधित महाराष्ट्रातच आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या व मृत्यू दर हे भारतातील इतर राज्यांच्या तुलनेने जास्त असल्याकारणाने महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे.
MINISTRY OF HEALTH AND FAMILY WELFARE DEPARTMENT ची दिनांक 28 जुलै 2020 रोजीची कोरोनाबाबतीत आकडेवारी खालीलप्रमाणे:

भारत
एकूण बाधित संख्या आतापर्यंत:1531669        
सक्रीय केसेस(Active Cases):509447 व दर:33.26%
बरा झालेले:988029 व दर:64.50%              
मृत्यु:34193  व दर:2.23%

महाराष्ट्र
एकूण बाधित संख्या आतापर्यंत:391440            
सक्रीय केसेस(Active Cases):144998 व दर:37.04%
बरा झालेले:232277 व दर:59.34%              
मृत्यु:14165  व दर:3.62


नांदेड                                                                                    (आकडेवारी, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, दिनांक 28 जुलै 2020)
एकूण बाधित संख्या आतापर्यंत:1368           
सक्रीय केसेस(Active Cases):670 व दर:48.98%
बरा झालेले:644 व दर:47.1%             
मृत्यु:54  व दर:3.9%
        देशात  राज्यात व जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या व मृत्युपावणाऱ्यांची संख्या वाढत असलेली दिसून येते. मृत्युदर मात्र कमी होत असताना दिसून येते. हे मृत्युदर व याचा प्रसार कमी राहण्यामागील कारण शासनाने योग्य वेळी लादलेली कडेकोट टाळेबंदी, लोकांमध्ये निर्माण झालेली जागरुकता, येतील हवामान, लोकांचे जीवनमान व रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे हे होय. 
      असे असले तरी, आपल्या देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या व मृत्यू पावणाऱ्यांची एकूण  संख्या कमी राहण्याचं प्रमुख कारण हे जगाचा तुलनेत येते community spread  कमी झाला. परंतु, अलीकडील परिस्थितीवरून व येत असलेल्या आकडेवारीवरून असे लक्षात येते कि एकूण बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असलेली दिसून येते. म्हणजेच हळूहळू community spread व्हायला लागली आहे. एकदा जर community spread मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली कि मग त्याला रोकणे खूपच अवघड आहे. देशातील उपलब्द मर्याधित आरोग्य सोयी, सुविधा लक्षात घेता, यांवर प्रचंड ताण निर्माण होईल. मोठ्या प्रमाणात बाधित झालेल्या व होणाऱ्या लोकांना या सोयी, सुविधा उपलब्द करून देणे हे अडचणीचे ठरेल. तसेच सगळ्यांचे जीवनमान व रोगप्रतिकार शक्ती सक्षम असू शकते असं नाही. परिणामी, भविष्यात आपल्या देशात community spread मोठ्या प्रमाणात जर झाला तर बाधितांची संख्या वाढू शकते व मृत्युदर वाढू शकते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. तेंव्हा कोणीच काही करू शकत नाही. म्हणून लोकांनी बेजबाबदारपणाने वागणे सोडून द्यावे. कोरोना या आजाराबाबतीत बाबत नेहमी सावध व जागृत राहावेत. सर्वांनी काठेकोरपणे वैयक्तिक स्वच्छता बाळगावीत, वैयक्तिक काळजी घ्यावेत. तसेच शासनाच्या प्रत्येक धोरणास व निर्णयास सक्रीय प्रतिसाद द्यावेत. तरच या साथीच्या आजाराला रोखणे शक्य होईल, असे वाटते.  

By….
S.M. Rachawad
At post Nanded.

No comments:

Post a Comment

कोरोना महामारीचा विस्फोट: एक दृष्टीक्षेप

कोरोना महामारीचा विस्फोट: एक दृष्टीक्षेप जागतिक स्थिती थोडक्यात... 1 ते 10 लाख बाधित होण्यासाठी लागलेला कालावधी (सर्वाधिक बाधित राष्ट्र): 1)...