Saturday, August 1, 2020

मनावर नियंत्रण प्रस्थापित करणे हिच जीवनाची खरी यशस्वीता

मनावर नियंत्रण प्रस्थापित करणे हिच जीवनाची खरी यशस्वीता
        बऱ्याच जणांना वाटतं की, एकदा मनाची एकाग्रता प्राप्त झाली, की स्मरणशक्ती वाढते. मग त्या बळावर व्यक्ती आपल्या जीवनात यश संपादन करतो व प्रगती शकतो. काही वेळेस ही एकाग्रता भंग झाल्यास किंवा टिकवून ठेवण्यासाठी तो योगासने, विपश्यना, ध्यानधारणा याचा अवलंब करतो. पण मनाची ही एकाग्रता आयुष्यभर टिकून राहील याची शाश्वती नसते. एखादा प्रतिकूल प्रसंग माणसाच्या जीवनात घडला की,  ती एकाग्रता उध्वस्त होते. अशा वेळेस व्यक्ती चलबिचल व अविचारी होऊन वाम मार्ग पत्करू शकतो. 
        त्यावेळेस मला असं वाटत की,  मनाची खांबीरता, प्रसंग झेलण्याची क्षमता, धैर्य व साहस हे महत्वाचे ठरतात. पण काही व्यक्तींना ते जमत नाही म्हणून ते वाम मार्ग पत्करतात. 
        सांगायचं तात्पर्य, जेंव्हा व्यक्ती जीवनातील आशा कठीण प्रसंगाला धैर्याने, हिमतीने सामोरे जाऊन त्यातून बाहेर येतो, तेंव्हा तो अधिक बलवान, खंबीर बनतो. त्याच्या मनावर प्रचंड नियंत्रण प्रस्थापित होते. परिणामी तो आपल्या मनावर अधिराज्य गाजवतो. तेंव्हा त्याला आपल्या जीवनात घडून गेलेल्या/घडत असलेल्या/ घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगकडे तो Deep and logical understanding ने पाहतो. तेंव्हा त्याला सुख व दुःख हे समभाव दृष्टीने पाहतो तेव्हा त्याच्यात भगवद्गीतेत सांगितलेली स्थित प्रज्ञात आलेली असते. मग तो कसल्याही प्रतिकूल परिस्थितीत भंग झालेली मनाची एकाग्रता प्राप्त करून हवे ते ध्येय  साध्य करू शकतो.

By...
S. M. Rachawad.

No comments:

Post a Comment

कोरोना महामारीचा विस्फोट: एक दृष्टीक्षेप

कोरोना महामारीचा विस्फोट: एक दृष्टीक्षेप जागतिक स्थिती थोडक्यात... 1 ते 10 लाख बाधित होण्यासाठी लागलेला कालावधी (सर्वाधिक बाधित राष्ट्र): 1)...